भुसावळ येथे ‘एक दिवसीय प्रथम वर्ष बीसीए अभ्यासक्रम पुनर्रचना’ कार्यशाळा

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचलित भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने  “एक दिवसीय प्रथम वर्ष बीसीए अभ्यासक्रम पुनर्रचना” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये BCA अभ्यासक्रमाच्या  तिनही वर्षांची सत्रनिहाय पुनर्रचना करण्यात आली.

व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्या डॉ. मिनाक्षी वायकोळे, प्रमुख पाहुणे माजी प्र. प्र. कुलगुरू के बी सी एन एम यू व संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान अभ्यासमंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. बी. व्ही. पवार, निमंत्रक व  उपप्राचार्य आणि संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान अभ्यासमंडळाचे  सदस्य प्रा.  डॉ. बी. एच. बऱ्हाटे, तसेच संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान अभ्यासमंडळाचे सदस्य प्रा. डॉ. राम भावसार, प्रा. डॉ. वैशाली पाटील, प्रा. डॉ. वर्षा पाठक, डॉ. जी. आर. वाणी. उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील., उपप्राचार्य डॉ. एन. इ. भंगाळे, प्रा. तनुजा फेगडे आणि कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. स्वाती प्रवीण फालक हे उपस्थित होते.

या FYBCA  अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे उदघाटन वृक्षास पाणी देऊन करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. बी. व्ही. पवार यांनी कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली.  कार्यशाळेतील प्रत्येक विषयाच्या पुनर्रचनेसाठी समनव्यक नेमण्यात आले. प्राचार्य डॉ. मिनाक्षी वायकोळे  यांनी अध्यक्षीय भाषणात बदलत्या युगानुसार अभ्यासक्रम बदलणे सुद्धा अनिवार्य आहे असे मत व्यक्त केले. डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूनम महाजन व प्रा. मेघा चौधरी तसेच आभारप्रदर्शन प्रा. डॉ. स्वाती फालक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणक शास्त्र विभागातील प्रा. डॉ. गौरी पाटील, प्रा. हर्षल पाटील, प्रा. अर्चना भालेराव, प्रा. पूजा हेडा, प्रा. वैशाली पाटील, प्रा. ममता कोल्हे, प्रा. तेजल  वारके, प्रा. कल्याणी पाटील, प्रा. डीगंबर महाजन,  प्रा. पौर्णिमा पाटील , विनय चौधरी, चुडामण कोल्हे, भरत कोळी आणि श्रीकांत चौधरी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला नाहटा  महाविद्यालयातील प्रा. सपना कोल्हे, प्रा. कौस्तुभ पाटील आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यशाळेतील अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेसाठी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान अभ्यासमंडळाचे  चेअरमन प्रा. डॉ. बी. व्ही. पवार आणि सदस्य प्रा. डॉ. राम भावसार, प्रा. डॉ. वैशाली पाटील, प्रा. वर्षा पाठक,  प्रा.  डॉ. बी. एच. बऱ्हाटे, प्रा. डॉ. जी. आर. वाणी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

Protected Content