पाचोरा येथे कन्या विद्यालयात कुष्ठरोग विषयक मार्गदर्शन

WhatsApp Image 2019 07 15 at 3.51.25 PM

पाचोरा (प्रतिनिधी) : येथील माध्यमिक व व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयात सोमवार दिनांक १५ रोजी कुष्ठरोग या आजाराविषयी माहिती देण्यात आली.

यावेळी पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे प्रतिनिधी डॉ. एकनाथ पाटील यांनी उपस्थित विद्यार्थिनींना राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रम अंतर्गत कुष्ठरोगाची लक्षणे, उपचार व त्याबाबतची सावधानता याविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रा.आर. बी. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रतिभा परदेशी यांनी आपल्या जीवनातील आरोग्याचे महत्व यावर मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ.एकनाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर हेमराज पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी प्राचार्य संजय पवार, सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले, प्रा किसन भारूळे, अंबालाल पवार , , एन आर बाविस्कर, शरद साळुंखे, प्रा. अंकिता देशमुख, प्रा. संगिता राजपूत, प्रा प्रतिभा पाटील, प्रणाली टोणपे, कल्पना पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.

Protected Content