अमोल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गतिमंद मुलांच्या शाळेमध्ये फळ वाटप 

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगांव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे ता.जि.धुळे संचलित परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा या शाळेचा विद्यार्थी-विद्यार्थीनींना फळ वाटप करण्यात आले व शहरातील श्री बालाजी महाराज मंदिरामध्ये अभिषेक पूजा व आरती करण्यात आली व धरणगाव रोडवरील पिपरखेड मारुती मंदिरामध्ये दर्शन घेतले व आज सायंकाळी ८ वाजेला आझाद चौकामध्ये ह.भ.प.सोपानदादा महाराज कनेरकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केला आहे.

यावेळी शेतकी संघाचे संचालक प्रकाश पाटील, उद्योजक संजय चौधरी, अमृत चौधरी, दिनेश पाटील, विलास वाघ, विनोद पाटील, पी.आर.वाणी, राजेंद्र पाटील, शहरप्रमुख भुषण भोई, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, उपशहरप्रमुख नितीन बारी, मुंदाणे प्र.ऊ.सरपंच एकनाथ पाटील,पंकज मराठे, सावन शिंपी, राजु पाटील, गोरख चौधरी, चेअरमन, योगेश महाजन,मुख्याध्यापक मनिष जाधव सर, उपमुख्याध्यापक हेमंत महाजन सर, सोनवणे सर, कुणाल महाजन सर, सतिष शेलकर सर, दिपक पानसे, कैलास महाजन सर, अनिल चौधरी यांचेसह शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

Protected Content