घरासमोरून तरूणाची दुचाकी लांबविली

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील तरुणाची घरासमोरून ६० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी १० ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा संजय सुतार (वय-२३) रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव हा आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. ६ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता कामावरून आल्यानंतर त्यांनी त्याची दुचाकी (एमएच १९ डीएक्स ५४९०) ही त्याच्या घरासमोर पार्किंगला लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ६० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजता समोर आले आहे. कृष्णा सुतार याने त्याची दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला.

परंतु दुचाकी कुठेही मिळून न आल्याने सोमवारी १० ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.

Protected Content