विनयभंग प्रकरणातील फरार आरोपी गजाआड

bhusawal news

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील डी.एल. हायस्कुलमधून पतीसोबत घरी जात असतांना एका विवाहितेचा विनयभंग करून फरार असलेल्या तरूणाला भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी फैजपूर येथून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मीना (नाव बदललेले) ह्या आपल्या पतीसोबत 18 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास शहरातील डी.एल. हायस्कूलमधून घरी जात असतांना आरोपी अल्ताफ उर्फ कचोरी शरीफ तडवी वय-22 रा भुसावळ यांने फिर्यादीचा विनयभंग करून विवाहितेच्या पतीस मारहाण करून खिश्यातील 400 रूपये रोख हिसकावून फरार झाला होता. याबाबत भुसावळ बाजार पेठ पोलीसात भाग 5 गुरंन 179/2019 भा द वि कलम 394, 354, 323, 427, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास पवार यांना आरोपी हा फैजपूरातील इस्लामपूरा भागात आला असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या सुचनेवरून मार्गदर्शनाखाली पो.ना. रमण सुरळकर, पो. कॉ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव यांनी कारवाई करत आरोपीस अटक केली आहे.

Protected Content