जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विभाग क्रीडा समितीची सभा आयोजित करण्यात आली होती.
सभेच्या अध्यक्षस्थानी जळगाव विभाग क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत वारके होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी सांगितले की, मागील वर्षी कोरोना मुळे बराच कमी वेळ मिळाला यामध्ये खेळांचे नियोजन करताना सर्व महाविद्यालयाच्या क्रीडा संचालकांनी सहकार्य केले. प्रत्येक स्पर्धा घेतली गेली. खेलो इंडिया स्पर्धेमध्ये आपल्या विभागाधील बऱ्याच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
महाविद्यालयामध्ये क्रीडा संचालक खूप महत्वाचा आहे. ते विद्यार्थ्यांना खेळामध्ये घडवायचे काम करतात. आपल्या विभागमधील सर्व स्पर्धांमध्ये क्रीडा संचालकांचा मनापासून सहभाग होता त्यामुळेच या वर्षाचे खेळांचे नियोजन यशस्वी करू शकलो. तसेच सन्माननीय विद्यापीठाने जो यजमान पदाचा मान दिला होता त्यांचे देखील आभार व्यक्त केले. पुढील यजमान पदाचा मान हा एम.जे. महाविद्यालयास दिला गेला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता पाटील व डॉ. पी.आर. चौधरी यांनी केले. आभारप्रदर्शन जळगाव विभाग क्रीडा समितीचे सचिव प्रा. चंद्रकांत डोंगरे यांनी केले.
याप्रसंगी शिरीष मधूकरराव चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.बी. वाघूळदे यांना कबचौ उमविचा उत्कृष्ट प्राचार्यांचा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयातर्फे व जळगाव विभाग क्रीडा समिती तर्फे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सदर सभेस प्राचार्य एस.एन.भारंबे, प्राचार्य जे. बी.अंजाने, प्राचार्य आर.बी. वाघूळदे, प्राचार्य पी.व्ही.दलाल, प्राचार्य के.पी.पाठक तसेच विविध महाविद्यालयामधील क्रीडा संचालक उपस्थित होते.