गोडसे, सावरकरांचा DNA असलेल्यांनाच शेतकऱ्यांंमध्ये देशद्रोही दिसतात

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । ज्यांच्यामध्ये नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा DNA आहे, त्याच लोकांना (नेत्यांना) या शेतकऱ्यांमध्ये नक्षलवादी आणि देशद्रोही दिसतात”, अशी बोचरी टीका समाजवादी पक्षाचे प्रवक्ते सुनिल सिंग साजन यांनी केली.

“देशातील शेतकरी वर्ग रास्त मागण्यांसाठी दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत गेल्या अनेक दिवसांपासून अविरत आंदोलन करत आहे. पण सरकारला मात्र हे आंदोलन दडपायचे आहे , असेही ते म्हणाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायदांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षाने भारत बंदही पाळला होता. सत्ताधारी पक्षातील नेते मात्र या शेतकरी आंदोलनात राजकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप सातत्याने करताना दिसत आहेत. काही सत्ताधारी नेत्यांनी तर या आंदोलनात शेतकऱ्यांमध्ये काही नक्षलवादी आणि देशद्रोही घुसले असल्याचाही आरोप केला आहे. त्या आरोपांना समाजवादी पक्षाकडून उत्तर देण्यात आले.

“अखिलेश यादव यांनी ठरवलं आहे की शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ गावोगावी फिरून कायद्याविरोधात निषेध नोंदवायचा. आमंच्या विरोधात कितीही खटले दाखल करण्यात आले तरीही आम्ही थांबणार नाही. आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं किंवा आंदोलन दडपण्यासाठी ठोकशाहीचा वापर करण्यात आला तरी आम्ही एकही पाऊल मागे हटणार नाही. शेवटपर्यंत समाजवादी पक्ष तीन काळ्या कायद्यांविरोधात निषेध करतच राहिल”, असा निर्धारदेखील त्यांनी व्यक्त केला.

“प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात पक्ष कार्यालयात आमचे कार्यकर्ते शांततापूर्ण आंदोलन करत निषेध नोंदवतील. सरकारला जे काही करायचं आहे ते त्यांनी करावं. समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन भाजपाचा खोटारडेपणा उघड करतील”, असेही ते म्हणाले.

Protected Content