हे राम नव्हे तर हराम ! : अरविंद सावंत संतापले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजप आमदार राम सातपुते यांना त्यांच्या आरोपावरून उत्तर दिले आहे.

भाजपचे आमदार राम सातपुते यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या भाषेत टिका केली. यात त्यांनी ”आधी फाटलेल्या चड्डीला ठिगळं लावा, उगाच आभाळ हेपलायचे धंदे बंद करा,” असं ट्विट राम यांनी केलं होतं. त्यांनी हे ट्विट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलं होतं. त्यावर अरविंद सावंत यांनी सातपुते यांच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत पलटवार केला आहे.

‘कोण हे राम ! सातपुते.. भाजपचे सदस्य का? काय त्यांची भाषा, हेच का भाजपचे हिंदुत्वाचे संस्कार! आदरणीयचा असा घोर अपमान करणारे राज्यकर्ते भाजपचे अलंकारात. हे कसले राम, हे तर हराम. त्यांच्यावर शोध करून शोधणे आहेत देवेंद्र फडणवीसजी रामराज्याची भाषा करू नका”, असे ट्विट अरविंद सावंत यांनी केलं आहे.

Protected Content