नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात गेल्या २४ तासांत देशात ५७ हजार ९८२ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, ९४१ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आता एकूण मृतांची संख्या ५० हजार ९२१ झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ६ लाख ७६ हजार ९०० सक्रीय रुग्म आहेत. तर, १९ लाख १९ हजार ८४३ रुग्ण निरोगी झाले आहे.
आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी ही आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार भारतात करोनाचा संसर्ग वेगाने वाढतच असल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात ५७,९८२ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या आता २६ लाखांच्या पार पोहोचली आहे. देशात आतापर्यंत ३ करोड़ ४१ हजार ४०० लोकांची चाचणी करण्यात आली आहे. रविवारी एकाच दिवसात ७ लाख ३१ हजार ६९७ लोकांची चाचणी करण्यात आली. दरम्यान, भारतातील मृतांचा आकडा ५० हजार पार झाला आहे. एकूण मृतांच्या संख्येत जगभरातील देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे.