अमळनेरात कोरोनाचा पुन्हा वाढला संसर्ग

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

अमळनेर तालुक्यात पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग आढळून आला होता. तथापि, प्रशासकीय यंत्रणांच्या प्रयत्नांमुळे याला काही प्रमाणात आळा बसला होता. मध्यंतरी तर तालुका कोरोनामुक्त झाला होता. तथापि, गत काही दिवसांपासून तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

अमळनेर तालुक्यात रविवारी सायंकाळी एकाच दिवसात तब्बल ७२ कोरोनाचे बाधीत आढळून आले आहेत. एकाच दिवशी इतक्या जास्त प्रमाणात रूग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार आहे. दरम्यान, कालच्या रूग्णसंख्येमुळे तालुक्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांचा आकडा हा १४६३ इतका झालेला आहे. म्हणजेच बाधीतांचा आकडा हा दीड हजाराच्या उंबरठ्यावर पोहचला आहे.

प्रशासकीय यंत्रणांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील कोरोनाचे रूग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे. रविवारी एकाच दिवसात ५२ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून एकूण बरे होणार्‍यांची संख्या ८९० इतकी झालेली आहे. तर काल दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मयतांची संख्या ५४ इतकी झालेली आहे. तर सध्या ५१९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

सध्या अनलॉकची प्रक्रिया गतीमान झाली असल्याने बाजारपेठेसह सार्वजनीक स्थळांवरील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात अनेक ठिकाणी फिजीकल डिस्टन्सींगसह अन्य नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे रूग्ण संख्येच्या वाढीला आळा घालण्यात अपयश आल्याचे दिसून आले आहे. अर्थात, यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner

Protected Content