कठूआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण : सात पैकी सहा आरोपी दोषी

kathua 1523428249

 

पठाणकोट (वृत्तसंस्था) जम्मू- काश्मीरमधील कठूआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी पठाणकोटमधील न्यायालयाने सात पैकी सहा आरोपींना दोषी ठरवले आहे. तर एका आरोपीला सबळपुराव्याअभावी दोषमुक्त केले आहे.

कठुआ प्रकरणामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आवारात सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. या प्रकरणी पंधरा पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानुसार गेल्या वर्षी १० जानेवारी रोजी मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार आणि नंतर तिचा खून करण्यात आला असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

आरोपींमध्ये राम, त्याचा मुलगा विशाल, पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, दोन विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंद्र वर्मा, हेट कॉन्स्टेबल तिलक राज आणि स्थानिक नागरिक परवेश कुमार यांच्याविरुद्ध बलात्कार, खून आणि पुरावे मिटवण्याच्या कृत्यांच्या आधारावर अनेक कलम लावण्यात आली होती. या प्रकरणाने जम्मू-काश्मीरमध्ये जातीय तेढ निर्माण झाली आहे, असे या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले होते. मारेक-यांना वाचवण्यासाठी जम्मूमध्ये आंदोलने , तर आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने करण्यात आली होती.

आस्ज न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. न्यायालयाने सात पैकी सहा आरोपींना दोषी ठरवले आहे. त्यानुसार मुख्य आरोपी सांजी राम, दीपक खजुरिया, सुरेंदर वर्मा, तिलक राज, आनंद दत्ता, परवेश कुमार या सहा जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर सांजी रामचा मुलगा विशाल याला न्यायालयाने दोषमुक्त केले.

Add Comment

Protected Content