कोरोना थोडा नरमला ; आजचे रुग्ण ४५१

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात आज ८२ रूग्ण आढळून आले आहे. तर जिल्ह्यात आज एकूण ४५१ कोरोना बाधीत असल्याचे सायंकाळच्या रिपोर्टमधून समोर आले आहे.

आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ४५१ रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान आज चाळीसगाव तालुक्यात आज तब्बल ८२ रूग्ण तर चोपडा तालुक्यात ६७ रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यातील आजची आकडेवारी
जळगाव शहर- ५७ , जळगाव ग्रामीण-१९; भुसावळ-४८; अमळनेर-६६; चोपडा-६७; पाचोरा-७; भडगाव-५; धरणगाव-१९; यावल-२२ ; एरंडोल-२०; जामनेर-१०; रावेर-६; चाळीसगाव-८२; मुक्ताईनगर-१०; बोदवड-६ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण ४५१ रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ३९ हजार २८७ रूग्ण संख्या झाली असून त्यापैकी २८ हजार ४६१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज १९ रूग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकुण मृतांचा आकडा ९९० वर पोहचला आहे. तर ९ हजार ८३६ रूग्ण कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.

Protected Content