गरुड विद्यालयात मोफत पुस्तके वाटप

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आज मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.

गरूड विद्यालयात ग्रामीण भागातून येणार्‍या विद्यार्थ्यांचा भरणा अधिक असून लाख डाऊनच्या काळात त्यांना मिळालेली पुस्तक म्हणजे पालकांना मोठा आधार झालेला आहे अशी भावना एका पालकाने यावेळेस व्यक्त केली . विशेष म्हणजे या शाळेत मराठवाड्यातून येणारी विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात असून जिल्हा बंदी असल्याने वाहतुकीची साधने बंद आहेत. त्यामुळे त्यांना पुस्तके घेण्यात येणार नाही व घरी अभ्यास बुडणार या काळजीत विद्यार्थी असताना शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांना मोठा मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस.पी. उदार यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होता.

यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितले की दिलेल्या पाठ्य पुस्तका द्वारे घरीच अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. काही अडचण आल्यास वर्ग शिक्षकांची व्हाट्सअप व मोबाइलद्वारे संपर्क साधून शंकांचे निरसन करावे पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद राहतील. या योजनेचा लाभ पंधराशे विद्यार्थ्यांना मिळाला शिक्षकांनी तीन दिवसा आधी दूरध्वनी व मोबाईल द्वारे पालकांना कळविले होते. आज शाळेत शिक्षक वेगवेगळ्या ठिकाणी बसून विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करीत होते.

Protected Content