कुर्‍हा येथे कोरोनाचा संसर्ग; गावात औषधीचे वाटप

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कुर्‍हे (पानाचे) येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे येथे तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येत असून गावात रोग प्रतिकारक क्षमता वाढविणार्‍या औषधीचे वाटप करण्यात आले.

कुर्‍हे ( पानाचे ) येथे आजवर कोरोनाचा संसर्ग नव्हता. तथापि, आता गावात या विषाणूचा संसर्ग झाला असून याची एका तरुणाला लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. हा संसर्ग गावात वाढू नये यासाठी तो परिसर सील करण्यात आला आहे. ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात काळजी घेत आहे. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील यांनी तीन दिवस गाव बंद ठेवण्यात यावे असे आवाहन केले. ग्रामस्थांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. यानुसार शेती , कृषी , दूध डेअरी , मेडिकल , आदी अत्यावश्यक सेवा सोडून ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुभाष पाटील व मित्र परिवार यांनी गावात गोळ्यांचे वाटप केले.

याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील, पोलीस पाटील मनीषा पाटील, बावस्कर ग्रामपंचायत सदस्य सुनंदाबाई वराडे, वासुदेव वराडे, राजेंद्र भगत, किशोर वराडे, भागवत शिंदे, किशोर पाटील, श्रीकांत बरकले, एकनाथ धांडे, अमोल धनगर, संदीप शिंदे, धनराज शिंदे, विजय कोडी, धीरज भावसार व जितेंद्र धनगर आदींची उपस्थिती होती.

Protected Content