गणेशोत्सवानिमित्त जाहीर किर्तनाचे आयोजन

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री शिवाजी गणेश मित्र मंडळाच्या वतीने आझाद चौकात गणेशोत्सवाच्या निमित्ताने किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री शिवाजी गणेश मित्र मंडळ आयोजित आझाद चौक पारोळा प्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार श्री शिवचरित्रकार धर्मभूषण ह.भ.प. संदीप महाराज चाळीसगाव वाघाडीकर यांच्या गणेश उत्सवानिमित्त कीर्तनाच्या कार्यक्रम रविवारी ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते ११ वाजेच्या दरम्यान आयोजित केलेला आहे तरी शहरातील व तालुक्यातील भाविक भक्तांनी व गणेश भक्तांनी कीर्तनाच्या आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक श्री शिवाजी गणेश मित्र मंडळाचे ह.भ.प.बाल कीर्तनकार जयेश महाराज पारोळेकर यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.

Protected Content