बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यांवर कडक शासन करा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहरूण तलावाजवळील ट्रॅकवर कार रेसिंगमुळे बाकला आपला जीव गमवावा लागला आहे. या गुन्ह्यातील अल्पवयीन संशयित आरोपीसह त्याच्या पालकावर कडक कायदेशीर करवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन रविवारी ४ सप्टेंबर रोजी सकाळी मुस्लिम शिष्टमंडळाने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेहरुण तलावाजवळ कार रेसिंगमुळे ११ वर्षीय विक्रांत मिश्रा यास आपला जीव गमवावा लागला व ज्याच्या हलगर्जीपणामुळे जीव गेला तो मुलगाही अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून ज्याच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाला. त्या वाहन मालकाला म्हणजे त्या आरोपी चालकाच्या पालकांना अटक करून कायदेशीर कारवाई करा, अशी एक मुखी मागणी जळगाव शहरातील सामाजिक, राजकीय, धार्मिक व बिरादरीच्या प्रमुख मुस्लिम समाजाच्या एका शिष्टमंडळाने निवेदन देवून केली आहे.

जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद चांद अमीर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष मजहर पठाण, काँग्रेसचे महानगर प्रमुख अमजद पठाण, मीर शुक्रल्ला फाउंडेशनचे विश्वस्त मीर नाझीम अली, पटेल बिरादरीचे फहीम पटेल, सिकलगर बिरादरीचे अन्वर खान, युवा मानियार बिरादरीचे मोहसीन युसुफ, मरकजचे मुजाहिद खान आदींची उपस्थिती होती.

Protected Content