सुरभि मंडळातर्फे कोजागिरी पौर्णिमानिमित्त विविध स्पर्धा

surabhi mahila

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुरभि महिला मंडळातर्फे कोजागिरी पौर्णिमानिमित्त विविध मनोरंजनात्मक स्पर्धा नवसाचा गणपती मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आल्या.

या स्पर्धांच्या सुरुवातीला भुलाबाईचे पूजन स्वाती कुलकर्णी, रेवती शेंदुर्णीकर, मंजुषा राव, विनया भावे, सुनीता सातपुते यांच्याहस्ते करण्यात आले. प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा स्वाती कुलकर्णी यांनी केले. यावेळी परिसरातील जेष्ठ महिलांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कोजागिरी पौर्णिमाविषयी वैदेही नाखरे यांनी सविस्तर माहिती दिली. जेष्ठांसह सर्व महिलांनी लहानपणीची भुलाबाई ह्या विषयी आठवणी जागविल्या. कार्यक्रमात सहभागींनी विनोदी उखाणे घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. वैशाली ढेपे, नीलिमा जोशी यांनी स्वरचित कविता सादर करुन सर्वांनी मतदानाचा हक्क बाजवावा आणि मतदान जागृतीचा संदेशही मंडळातर्फे देण्यात आला. याचबरोबर, भुलाबाईची गाण्यावर सर्व महिलांनी फेर धरला. तसेच काही मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे नियोजन वैदेही नाखरे, विनया भावे यांनी केले. स्पर्धेचे परिक्षण मंजुषा राव व रेवती शेंदुर्णीकर यांनी केले. (आ बैल मुझे मार पहिले) या गाण्याच्या विजेत्या पूनम जोशी, मिना जोशी आणि (मिस्टरा च्या मिशा) शुभांगी पुरणकर, अंजली धवसे असे स्पर्धेचे विजेते आहेत. यानंतर अल्पोहार आणि दुग्धपानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मंजुषा राव, विनया भावे, सुनीता सातपुते, अश्विनी जोशी, मेघा नाईक, शुभांगी पुरणकर, हर्षा सोले, दीपाली सोले, डॉ. वैजयंती पाध्ये, साधना दामले यांनी सहकार्य केले.

Protected Content