आसोदा येथे चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली

62291f8b 8eb1 4665 9614 028bf193a9d3

 

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांची आसोदा येथे प्रचार रॅली आज सकाळी मोठ्या उत्साहात पार पडली.

 

यावेळी गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले. सदर सभेच्या वेळी आसपासच्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी चंद्रशेखर अत्तरदे यांनी कवयित्रि बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच गावातील महर्षि वाल्मिकी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करून गावातील प्रचार रॅलीस सुरुवात केली. यावेळी भाजपा जळगाव तालुका अध्यक्ष संजय भोळे, गावातील सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रमुख पदाधिकारी, ममुराबाद-आसोदा गटातील शक्ति प्रमुख सचिन चौधरी, कल्पेश, बूथ प्रमुख मनोज सवदे, खगेश नेहेते, प्रतिसाद चिरमाडे, सागर चव्हाण, उमेश महाजन, तुषार भोळे, जीवन सोनवणे, मनीष चौधरी, सदाशिव कोळी, गणेश वानखेडे तसेच गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content