ख्रिस मॉरिससाठी १६ कोटी २५ लाख रुपयांची बोली

 

 

 मुंबई : वृत्तसंस्था । २०२१ च्या आयपीएल लिलावात ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सनं १६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे. ७५ लाख रुपयांची मूळ किंमत असणाऱ्या ख्रिस मॉरिसला खरेदी करण्यासाठी संघमालकांमध्ये रस्सीखेच झाली

 

ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मॉरिसनं भारताच्या युवराज सिंहचा विक्रम मोडीत काढला आहे. युवराजला दिल्लीनं १६ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं.

 

आरसीबी, चेन्नई, पंजाब आणि राजस्थान या संघानं ख्रिस मॉरिसला आपल्या संघात घेण्यासाठी रस दाखवला. मात्र, राजस्थान संघानं १६ कोटी २५ लाख रुपये खर्च करत आपल्या संघात घेतलं आहे. ख्रिस मॉरिसनं गतवर्षीच्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना ९ सामन्यात ११ बळी घेतले होते. गेल्या आयपीएलच्या लिलावत मॉरिसला १० कोटी रुपयांत आरसीबीनं खरेदी केलं होतं. मात्र, यंदा आरसीबीनं मॉरिसला करारमुक्त केलं होतं.

 

 

युवराज सिंह  या   भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाजाला २०१५ मधील लिलावात १६ कोटी रुपयांची बोली लागली होती.  ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएलच्या लिलावात सर्वात महागडा वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. कमिन्सनं बेन स्टोक्सला मागे टाकलं. २०२० मध्ये कमिन्सला १५ कोटी ५ लाख रुपयांना कोलकातानं खरेदी केलं होतं.  २०१४ मध्ये युवराजला आरसीबीनं १४ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं.

Protected Content