Home Cities जळगाव तपासात सहकार्य नसल्याचा आरोप लावून अटकेची भीती — एकनाथराव खडसे

तपासात सहकार्य नसल्याचा आरोप लावून अटकेची भीती — एकनाथराव खडसे

0
46


 

मुंबई : वृत्तसंस्था । भोसरी जमीन खरेदी गैरव्यवहारात अंमलबजावणी संचालनालयाच्या  चौकशीसाठी हजर झाल्यावर तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप करून अटक केली जाईल, या भीतीने न्यायालयात धाव घेतल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यातर्फे  उच्च न्यायालयात करण्यात आला.

 

या प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने २४ फेब्रुवारीला ठेवल्याने तोपर्यंत खडसे यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

 

ईडीने बजावलेल्या समन्सविरोधात खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन समन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी झालेल्या सुनावणीच्या मुद्दय़ावर खडसे यांच्या वतीने अ‍ॅड्. आबाद पोंडा यांनी प्रामुख्याने युक्तिवाद केला.


Protected Content

Play sound