खेडी खुर्द शिवारातील मराठी शाळेजवळ वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील खेडी खुर्द शिवारातील मराठी शाळेजवळून अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर तालुका पोलीसांनी कारवाई करत वाळूचे वाहन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द शिवारातील मराठी शाळेच्या परिसरातून अवैधरित्या ट्रॅक्टरच्या मदतीने वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी दिल्या. त्यानुसार पथकाने दुपारी १२ वाजता खेडी खुर्द शिवारातील मराठी शाळेजवळ सापळा रचला.त्यावेळी विना क्रमांकाचे ट्रॅक्टर व ट्रॉलीने वाळू वाहतूक करत असल्याचे दिसून आले.

दरम्यान, पोलीसांनी कारवाई करत वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता ट्रॅक्टर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली आहे. पंचनामा करून वाहन जप्त करण्यात आले असतांना ट्रॅक्टर चालका वाहन सोडून पसार झाला होता.

याप्रकरणी पोलीस नाईक रामकृष्ण इंगळे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात दुपारी ३ वाजता ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक दिपक कोळी करीत आहे.

Protected Content