सोनी नगरात बंद घर फोडून दागिन्यांसह रोकड लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पिंप्राळा परिसरातील सोनी नगरात बंद घर फोडून घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोकड असा एकुण ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला. रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हेमंत प्रदीप सुर्यवंशी (वय-३१) रा. सोनी नगर, पिंप्राळा परिसर, जळगाव हे आपल्या पत्नी व दोन मुलांसोबत वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १ नोव्हेंबर रोजी हेमंत सुर्यवंशी हे पत्नीसह सासरवाडी नादेंड येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी घर बंद करून घेतले होते. नांदेड येथील काम आटोपून पुन्हा सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता सोनी नगरात राहत्या घरी आले असता कंम्पाऊंड गेटचे कुलूप तोडलेले दिसले,  घरात लोखंडी ग्रीलचा दरवाजा देखील तोडून आत प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे व चांदींचे दागिने, लॅपटॉप आणि मोबाईल असा एकुण ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहे.

Protected Content