घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात घरगुती गॅसचा काळाबाजार करुन गॅसचा वापर रिक्षात तसेच इतर वाहनांमध्ये भरण्यासाठी करणाऱ्या एका जणावर रविवार, १६ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जळगाव शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. संजय शंकरराव मोझर वय ५१ या च्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातल शिवाजीनगर परिसरातील नवीन उड्डाणपूलाखाली एका टपरीमध्ये संजय मोझर नावाचा व्यक्ती हा घरगुती गॅसचा वापर वाहनांमध्ये भरण्यासाठी करत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली, त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी रविवारी सायंकाळी शिवाजीनगरात छापा टाकला, यात संशयित संजय शंकरराव मोझर याच्याकडून एक घरगुती वापराचे सिलेंडर तसेच रिक्षात गॅस भरण्यासाठी लागणारे मोटार, पंप, गॅस रेग्युलेटर असा एकूण १७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन संजय मोझर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे हे करीत आहेत.

Protected Content