पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने एका कार्यक्रमात अचानक पेट घेतला. मात्र यातून त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
पुण्यातील हिंजवडीत आज सकाळी कराटे प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या उदघाटनात सुप्रिया सुळे या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हार घालण्यासाठी उभ्या राहिल्या. त्यावेळी मूर्तीसमोरच समई पेटवलेली होती. पुतळ्याला हार घालत असताना सुप्रिया सुळे यांच्या साडीचा पदर खाली आला. त्यामुळे साडीने लगेच पेट घेतला. सुप्रिया सुळे यांच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी तात्काळ आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, आमचे हितचिंतक, नागरीक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की, मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये. आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. आपणा सर्वांचे मनापासून आभार असे त्यांनी नमूद केले आहे.