फैजपूर येथे महाराष्ट्र जोडो अभियान संदर्भात समविचारी संघटनांची बैठक

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र जोडो अभियानाचे जळगांव येथे होणारे राज्य सम्मेलन व अन्य प्रश्नासाठी फैजपूर येथे समविचारी संस्था, संघटना व पक्ष यांची संवाद बैठक घेण्यात आली.

या बैठकीचे आयोजन फैजपूर येथील महात्मा गांधी सभागृहात आज सायंकाळी करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षस्थानी जनसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे होत्या.त्यांनी जळगांव येथे १ व २ जुलै २०२३ असे दोन दिवशीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी १ जुलै रोजी उद्घाटन होईल यात २० विषय असणार आहे.यात येणारे विचारवंत विचार व्यक्त करतील महाराष्ट्रातून २८८ मतदारसंघातून १३३ सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी याठिकाणी सहभागी होणार आहेत.यात विचारांची देवाणघेवाण होणार आहे.तसेच संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी गटचर्चा होवून समारोप होणार असल्याचे सांगितले. यानंतर अब्दुल करिम सालार सर यांनी संमेलनाची रूपरेषा विषयी माहिती दिली. तर मुकुंद सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान सध्या महागाई, बेरोजगारी आणि जगण्याचे प्रश्नाचे,खाजगीकरण यामुळे कष्टकरी- शेतकरी व मध्यम वर्गाचे रोजचे जगणे अवघड होत चालले आहे. हे सर्व सत्ताधाऱ्यांचे धोरणांचा व नाकर्ते पणाचा परिणाम आहे. शेतकऱ्याला हमी भाव न देणे,१४ जिल्हयातील शेतकऱ्यांचे रेशन बंद करणे, पर्यावरण व हवामान बदलाचे संकट, बेरोजगारी, महागाई, कामगार कायदासारखा क्रांतीकारी कायदा खिळखिळा करणे, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण ह्या सारखे मुद्दे जाणून बुजून निर्णय न लावणे, आदिवासी, दलितांचे प्रश्न न सोडवणे यासह अन्य प्रश्नावर चर्चा करून नियोजन करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आले.

जळगाव येथे होणारे संमेलन यशस्वी करणे हा या बैठकीचे प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगितले. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक मतदारसंघाचा हा संमेलन होत आहे. यात जवळपास १२०० प्रतिनिधी सहभागी होणार आहे. जळगाव येथे १ व २ जुलै २०२३ असे दोन दिवशीय संमेलन होणार आहे. हे संमेलन पक्ष विरहित आहे. यावेळी अनेक विचारवंत येणार आहे. या बैठकीला लोकसंघर्ष मोर्चाचे योगेश पाटील, मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्ष राम पवार, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, हाजी शेख हारून(सावदा), हयात खान, इरफान शेख (चिनावल) असगर सैय्यद(सावदा), सैय्यद जावेद जनाब, सुनिल फिरके, शिवसेना ठाकरे गट महिला तालुकाध्यक्ष रजनी उदय चौधरी, पिंटू चोपडे, नदीम पिंजारी, माजी नगरसेवक शेख जफर, माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान, कलिम खा मण्यार, केतन किरंगे, रशिद तडवी, डॉ. अब्दुल जलील, अब्दुल्ला शेख, आर. क्यू. शेख, फारूक अब्दुल्ला, शेख वसीम जनाब, प्रा.असलम तडवी, भारत चौधरी, मोहसीन शेख युनूस, नितीन कोळी, महाराष्ट्र जोडो फैजपूर कृती समितीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष अनवर खाटीक,काँग्रेस शहराध्यक्ष शेख रियाज शेख साबीर,अशोक भालेराव, वसीम तडवी, रामाराव मोरे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Protected Content