घरात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नातेवाईकांकडे लग्नासाठी आलेल्या प्रौढ व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, गजानन दामू भोळे (वय-५५) रा. पाडळसा ता.  यावल ह.मु. अंबरनाथ, मुंबई हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. पाडळसा येथे  लग्न असल्याने ते अंबरनाथ येथून गावाला रविवारी ८ मे रोजी नातेवाईक यांच्याकडे विष्णू बाळू भोळे यांच्या घरी आले होते. लग्न असल्याने लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी न्हावी हा बुधवारी ११ मे रोजी सकाळी विष्णू भोळे यांच्या घरी आले. त्यावेळी आवाज दिला असता आतून कुणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दरवाजा ढकलून पाहिले असता त्यांना दुर्गंधीचा वास आला. त्यांना एक कुजलेला मृतदेह आढळून आल्याने हा प्रकार लक्षात आला. हा प्रकार लक्षात येताच गावात एकच खळबळ उडाली आहे. फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून पंचनामा केला. याबाबत विष्णू भोळे यांच्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार सुधाकर पाटील करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!