बाळासाहेबांचे स्वप्न सभेद्वारे पूर्ण करणार का?- गजानन काळे

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेनंतर आता मुख्यमंत्र्यांची हुंकार सभा होत आहे. आमचे सरकार आले कि, मशिदीवरील भोंगे, रस्त्यावरील नमाज बंद करणार हे, बाळासाहेवांचे स्वप्न या सभेतून पूर्ण करणार का? असा प्रश्न ट्वीट करीत मनसेचे गजानन काळे यांनी विचारला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा, उत्तरसभा आणि औरंगाबाद येथे १ मे रोजी अशा तीन सभा घेण्यात आल्या. त्यातहि राज ठाकरे यांच्या औरंगाबाद च्या सभेच्या परवानगीमुळे अनेकानी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र या सभेला अनेक अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर १४ मे रोजी मुंबईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसी संकुलात शिवसेनाप्रमुखांची हुंकार सभा होत आहे. या टोमणे सभेला काही अटी- शर्ती आहेत का? असा प्रश्न मनसेचे गजानन काळे यांनी विचारला आहे.

आमचे हिंदुत्व अस्सल बाकीचे नकली

काही दिवसापासून भाजपा मनसे कडून हिंदुत्वाचा मुद्द्दा घेत शिवसेनेला लक्ष केले जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपच्या सभा झाल्या कि लगेच विरोधकांना उत्तर देण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्या टोमणे सभा होत आहेत. त्याप्रमाणेच आता १४ मे रोजी देखील बीकेसी मैदानात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे टीझर प्रसिद्ध केले जात असून त्यासाठी राज ठाकरे यांच्या सभेचे फोटो वापरण्यात आले असल्याचेही मनसेचे गजानन काळे यांनी, असली नकली म्हणणाऱ्याना स्वताचे आत्मपरीक्षण करा, सभेला गर्दी जमविण्यासाठी राज ठाकरे यांचीच मदत घ्यावी लागते का? असेही ट्वीट केले होते.

 

Protected Content