राजे छत्रपती संभाजी महाराजांतर्फे स्वराज्य संघटनेची घोषणा

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राजे छत्रपती संभाजी महाराज यांनी आपली राजकीय वाटचाल ही स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राहणार असून आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची घोषणा केली.

राजे छत्रपती संभाजी महाराज हे राज्यसभेतून नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यांच्या आगामी वाटचालीबाबत मोठ्या उत्सुकतेचे वातावरण आहे. या अनुषंगाने आपण १२ मे रोजी आपली भूमिका जाहीर करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. या अनुषंगाने आज पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

याप्रसंगी राजे छत्रपती संभाजी महाराज म्हणाले की, आगामी राज्यसभा निवडणूक ही अपक्ष म्हणून लढविणार आहोत. राज्याच्या राजकारणात तिसरी शक्ती उदयाला येण्याची गरज असून यासाठी आपण स्वराज्य संघटना स्थापन करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या महिन्यात आपण राज्यभरात दौरे करणार असून ठिकाठिकाणच्या नागरिकांशी संवाद साधणार आहोत. यानंतर राज्यातून निवडून देणार्‍या सहा राज्यसभा जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत आपण अपक्ष म्हणून उतरणार आहोत. यातील सहावी जागा ही आपल्याला मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: