मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – अमरावतीच्या राणा दाम्पत्याला विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानुसार आज खा. राणा यांची भायखळा तुरुंगातून सुटका झाली असली तरी प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात नेले जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मातोर्श्री समोर हनुमान चालीसा पठन प्रकरणी इशारा दिल्यानंतर, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याखाली आमदार आणि खासदार राणा दांपत्या गेल्या १२ दिवसापासून तळोजा आणि भायखळा कारागृहात होते. तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला.
बचाव पक्षाचा युक्तीवाद मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मान्य करीत विविध अटींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे.
त्यानुसार आज खा. नवनीत राणा यांची भायखळा तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. मात्र कारागृहातून बाहेर पडल्यानंतर प्रकृती अस्वास्थामुळे राणा यांना वैद्यकीय तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात नेण्यात येणार आहे.
तर दुसरीकडे नवी मुंबई येथील तळोजा कारागृहातून आ. रवी राणा यांची सुटकेची प्रक्रिया सुरु आहे नवनीत राणा यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता केवळ हात जोडून नमस्कार केला.
विशेष सत्र नायालयाने राणा दाम्पत्याची अटक बेकायदेशीर ठरवली असून या दाम्पत्याला अटक करण्यापूर्वी रीतसर नोटीस देणे गरजेचे होते, परंतु कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न होता मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली त्यामुळे बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करण्यात येऊन जामीन मंजुर केला आहे. सत्र नायालयाचा हा निर्णय राज्य सरकारला दिलेला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.