विविध मागण्यांसाठी ईलेक्ट्रिकल कन्स्ट्रक्शन असोसिएशनचे आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महावितरणकडून राबविण्यात आलेल्या निवीदा मधील कंत्राटी कामांची देयके तातडीने मिळावी यासह आदी मागण्यांसाठी ईलेक्ट्रिकल कन्स्ट्रक्शन असोसिएशनने  काम बंद आंदोलन पुकारले आहे.

 

आयोध्या नगरातील महावितरण कार्यालयासमोर ईलेक्ट्रिकल कन्स्ट्रक्शन असोसिएशनने    काम बंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे, एप्रिल २०१९ ते मार्च २०२२ कालावधीतील महावितरणच्या निविदेमधील कंत्राटी कामाची देयक त्वरित मिळावी. झालेल्या कामांचे पर्चेस ऑर्डर व ३१ मार्च २०२२ पर्यंत त्यासाठी लागणारे बजेटची तरतूद त्या सोबतच करण्यात यावी. ३१ मार्च २०२२ पर्यंतची देयकांची थकीत रक्कम ३० एप्रिल २०२२ पर्यत न मिळाल्याने उपोषण पुकारण्यात आले आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2028452190649462

 

Protected Content