पहूर येथील विद्यार्थ्यांना पुस्तके भेट

पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील गजानन क्रीडा संकुलात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुण्यातील जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांकडून पुस्तके भेट देवून आदर्श निर्माण केला आहे.

पहुर येथील व सध्या पुणे येथे कार्यरत सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी – पुणे दीपक पाटील यांचे संस्थेच्या वतीने चेअरमन भास्कर शंकर पाटील यांनी  विशेष आभार मानले. अलीकडच्या काळात ना.अजित पवार यांनी पोलिसांची  ७००० पदे  भरली जाणार आहे असे जाहीर केले त्या अनुषंगाने गावातील जास्तीत जास्त मुले पोलिस भरतीमध्ये यशस्वी व्हावे व गावचे नाव व लौकिक वाढवा म्हणून दीपक पाटील यांनी संस्थेला पुस्तके देऊन तरुणांना पोलीस भरतीसाठी प्रोत्साहन दिले. तरुणांना स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीसाठी अजून ही काही अडचणी असल्यास त्या सोडवण्याचे आश्वासन दिपक पाटील यांनी दिले. तरुणांनी त्यांचे आभार मानले व तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!