Home क्रीडा एसएसबीटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला क्रीडाभावना आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

एसएसबीटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला क्रीडाभावना आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एसएसबीटी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी जागरूकता निर्माण करण्यासह ऑलिम्पिकच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यालय प्रशासनाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य श्री. कौशिक भट्टाचार्य तसेच शिक्षिका सौ. अनिता प्रवीण पाटील यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचे महत्त्व, त्यामागील उद्दिष्टे आणि क्रीडाभावनेचे मूल्य याविषयी मार्गदर्शन केले. खेळामुळे व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, संघभावना आणि निरोगी जीवनशैलीला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले. तसेच ऑलिम्पिकच्या माध्यमातून जगभरात एकता, परस्पर आदर आणि शांततेचा संदेश दिला जातो, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यानंतर शिक्षिका सौ. दीक्षा सुमित परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक पोस्टर्स, फलक आणि मशालींसह विद्यालय परिसरात भव्य मशाल रॅली काढली. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत ऑलिम्पिक भावना, क्रीडासंस्कृती, पर्यावरण संरक्षण आणि सकारात्मक विचारांचा प्रभावी संदेश दिला. विविध घोषवाक्यांमधून विद्यार्थ्यांनी खेळाचे महत्त्व आणि एकतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.

मशाल रॅली हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रॅलीदरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी ज्यूसचे वाटप केले. विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत शिक्षकांनी त्यांना खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून दिले. विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासन यांच्या सहकार्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी आवड निर्माण होण्यास मदत झाली असून ऑलिम्पिकच्या एकता, मैत्री, उत्कृष्टता आणि आदर या मूल्यांचा प्रसार करण्यात आला.


Protected Content

Play sound