Home क्राईम महिलेस तलवारीच्या धाकावर धमकी आणि विनयभंग

महिलेस तलवारीच्या धाकावर धमकी आणि विनयभंग

0
31
FIR

Bhusawal भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील महिलेस तलवारीचा धाक दाखवून धमकावण्यासह विनयभंग केल्याच्या प्रकरणात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, राहूल पाटील व विष्णू पथरोड (रा. वाल्मीक नगर, ३२ खोली, भुसावळ) यांनी मंगळवारी रात्री एका महिलेच्या घरावर हल्ला करून त्यांना तलवारीचा धाक दाखवून धमकावले. याप्रसंगी त्या महिलेसह तिच्या कुटुंबाला मारहाण करून धमकावण्यात आले.

या अनुषंगाने संबंधीत महिलेने पोलीस स्थानकात धाव घेतली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार राहूल पाटील व विष्णू पथरोड (रा. वाल्मीक नगर, ३२ खोली, भुसावळ) या दोघांच्या विरोधात आर्म ऍक्ट आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound