मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । खासदार नवनीत राणा यांना अखेर बाराव्या दिवशी जेलमधून सोडण्यात आले आहेत. परंतु नवनीत राणा यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना मुंबई येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणांची कारागृहातून सुटका झाली आहे. भायखळा जेलमधून नवनीत राणा लिलावती रुग्णालयाकडे रवाना झाल्या. नवनीत राणांच्या छातीत दुखत असल्याने रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं. तब्बल 12 दिवसांच्या कोठडीनंतर नवनीत राणा जेलबाहेर आल्या आहेत. मात्र जेलमध्ये असताना त्यांची तब्बेत बिघडल्याचं समोर आलंय. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणारच, अशी घोषणा केलेल्या आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात काही दिवस चर्चेचे विषय ठरलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा, या दाम्पत्याची आज अखेर जामिनावर सुटका करण्यात आली.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेल्या राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाल्यानंतर, आज त्यांची जेलमधून सुटका करण्यात आली आहे. जामीन मिळाल्यानंतर त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलू नये, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. जेमधून सुटका झाल्यानंतर राणा यांना लिलावती रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट धरला होता. त्यानंतर मुंबईत शिवसैनिकही आक्रमक झाले होते. त्यानंतर अमरावतीतून राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले खरे, मात्र पंतप्रधआन नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे कारण देत त्यांनी मातोश्रीवर येणे टाळले होते. त्यानंतर त्यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही सरकारच्या वतीने दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांना नोटिसीशिवाय अटक करण्यात आल्यावरुनही वाद झाला होता.