जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य वीज कामगार कर्मचारी अधिकारी अभियंते संघर्ष समितितर्फे महाराष्ट्र राज्य वीज उद्योगातील तिन्ही कंपन्यांचे एकतर्फी कार्य पद्धती व खाजगीकरण धोरणाविरुद्ध निषेध नोंदवून बदली धोरण परीपात्राची होळी करण्यात आली.
महाराष्ट्रातील चार वीज कंपन्यामधील कार्यरत सर्व कामगार कर्मचारी अधिकारी अभियंते संघर्ष समितीतर्फे दि. १६ फेब्रुवारी रोजी जळगाव मंडळ कार्यालयासमोर द्वार सभा व निदर्शने करून सुत्रधारी कंपनीच्या बदली धोरण परिपत्रकाची होळी करण्यात आली. यावेळी आंदोलोकांनी पुढील मागण्या केल्या आहेत. यात महावितरण, महानिर्मिती, महापारेषन कंपन्यांमध्ये सुरू करण्यात येत असलेले खाजगीकरण त्वरित रद्द करा. केंद्र सरकारचे विद्युत संशोधन विधेयक २०२१ त्वरित रद्द करा. महानिर्मिती कंपनी संचालित असलेले वीज निर्मिती केंद्र खाजगी उद्योजकांना देण्याचे धोरण त्वरित रद्द करा. तिन्ही कंपन्यांतील रिक्त पदे रण्यात होत असलेली दिरंगाई टाळा. तिन्ही कंपन्या मधील कार्यरत कर्मचारी अधिकारी अभियंते यांच्या बदली धोरणावर एकतर्फी निर्णय रद्द करा. तिन्ही कंपन्यांतील वरिष्ठ पदांवरील अनावश्यक भरती, बदल्या यामधील राजकीय हस्तक्षेप. बंद करा या मागण्यांचा समावेश आहे. आजच्या आंदोलनामध्ये कृती समितीच्या स्थानिक पदाधिकारी कॉ. विरेंद्र सिंगपाटील, कॉ. दिनेश बडगुजर , आर आर सावकारे, पराग चौधरी, कुंदन भंगाळे, एस. के. लोखंडे, सुलेमान तडवी, श्री. विरघट, विजय सोनवणे, सादिक शेख, हिरालाल पाटील, संध्या पाटील, बी. पी. अनुसे, विनोद सोनवणे, मुकेश बारी यांच्यासह सुमारे ४०० वीज कामगार कर्मचारी अधिकारी अभियंते सहभागी झाले होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/628632698211608