‘त्या’ संशयित विदेशी नागरिकाला खान्देशी पाहुणचार

जळगाव प्रतिनिधी । आज सकाळी कोरोनाच्या संशयातून तपासणी करण्यात आलेल्या विदेशी नागरिकाला संसर्गाची कोणतीही चिन्हे न दिसल्याने सर्वांनी सुटकेचा श्‍वास सोडला. तर सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख यांनी त्यांना सर्वतोपरी मदत करून खान्देशी पाहुणचार केला.

याबाबत वृत्त असे की, आज सकाळी जनता कर्फ्यू सुरू असतांना फ्रेंच नागरिक ज्युलियन हे कोर्ट चौकात आढळून आले होते. एका पोलीस कर्मचार्‍याने याबाबत आपल्या अधिकार्‍यांना माहिती देऊन संबंधीत नागरिकाला जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, जिल्हा रूग्णालयात ज्युलियन यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्‍वास सोडला. या सर्व धावपळीत रोटरी परिवार आणि माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांनी ज्युलियन यांची मदत केली. यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्तक्षेपानंतर ज्युलियन यांना एका हॉटेलमध्ये रवाना करण्यात आले.

या सर्व धावपळीत अरविंद देशमुख यांनी ज्युलियन यांना मदत केली. जनता कर्फ्यू सुरू असल्याने त्यांना भोजन मिळणार नाही म्हणून त्यांनी आपल्या मातोश्रीने तयार केलेल्या पिठले आणि भाकरीचे जेवण ज्युलियन यांनी दिले. त्यांना हे भोजन आवडले. अर्थात, आजच्या सर्व घडामोडींनी ज्युलियन यांना चांगलाच मनस्ताप झाल्याचे दिसून आले.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content