पाचोरा, नंदू शेलकर । तालुक्यातील खडकदेवळा बु” येथील खान्देशी टिम च्या चिमुकल्यानी यंदा प्रथमच गणपती बाप्पा ची स्थापना केली. आज गणेश विसर्जनाच्या दिवसी या चिमुकल्यांनी ग्रामस्थांना अन्नदानाची मेजवानी दिली. त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खडकदेवळा बु येथे खान्देशी टिमच्या लहानग्यांनी एकत्रित येऊन गणेश विसर्जनाच्या दिवशी गावातील ग्रामस्थांना आन्नदान केले. या लहान मुलांच्या आन्नदानाच्या पंगतीची चर्चा संपुर्ण खडकदेवळा बु” तसेच परिसरात जोरदार सुरू होती. या आन्नदानाच्या पंगतीसाठी या लहान मुलांनी गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून वर्गणीच्या माध्यमातूनच गणपती बाप्पाच्या विसर्जनाप्रसंगी ग्रामस्थांना अन्नदान केले. खान्देश टीमचे सदस्य असलेल्या वरुण मानिक देवरे, भावेश ज्ञानेश्वर पाटील, निलेश नंदु पाटील, प्रथमेश रोहिदास पाटील, मयुर शिवाजी देवरे, गौरव वसंत देवरे या लहानग्यांनी ही संकल्पना साकारली. याकामी खडकदेवळा बु गावातील भारतीय सैन्यातील सैनिक रामेश्वर दिलराज चौधरी, तसेच किरण अशोक कोळी, अशोक विठ्ठल निकम, आबा शिंदे, मोनु जाधव, वैलचंद निकम, दादा मौची, ज्ञानेश्वर शिंदे, चेतन सुर्यवंशी, आदींनी मोलाचे सहकार्य केले. तर श्री गणेशाच्या स्थापनेपासून तर विसर्जनाच्या कार्यक्रम घेण्यात प्रसाद आविनाश पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1170530683437220