पारोळा येथे डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात

parola

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बहादरपुर येथे रा.का.मिश्र विद्या मंदिरात आज (दि.15) डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या निमित्ताने स्वच्छता, व्यक्तिमत्व विकास, वाचाल तर वाचाल, आरोग्य व इतर विषयांवर सखोल असे मार्गदर्शन विद्यालयाचे विज्ञान शिक्षक एस.बी.चौधरी यांनी केले. त्यांनी उदाहरणांसह स्पष्टीकरण करत विद्यार्थ्यांना, जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्व पटवून दिले. तसेच वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने कु. पूजा पाटील हिस एक पुस्तक भेट देऊन वाचनाची प्रेरणा दिली. यावेळी काही विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन त्यांच्याकडून वाचन करून घेतले. अध्यक्ष म्हणून प्राचार्य बी.व्ही.अमृतकर यांनी अध्यक्ष पद भूषविले आणि अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.भोई यांनी केले तर आभार प्रदर्शन एन.एस. ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Protected Content