जळगाव खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक तसेच शिपाई राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

जळगाव, प्रतिनिधी  । अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अमरावती द्वारा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाला. त्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपला ठसा उमटवत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने ते पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यात त्र्यंबक नगर प्राथमिक शाळेचे उपशिक्षक निलेश रामाराव मोरे , खूबचंद  सागरमल प्राथमिक शाळेचे उपशिक्षक निखिल लक्ष्मण जोगी , का. उ. कोल्हे विद्यालयाचे उपशिक्षक गौरव सुभाष भोळे यांना साने गुरुजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयाचे शिपाई सुधीर सोपान वाणी यांना सरदार वल्लभभाई पटेल आदर्श सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रमुख पाहुणे  पारोळा नायब तहसीलदार भानुदास रघुनाथ शिंदे  ,  मानवी अन्याय निवारण केंद्र  उमाकांत वाणी , जिल्हाप्रमुख हरिश्चंद्र बाविस्कर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सर्वांचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामार्फत अभिनंदन करण्यात आले.

 

Protected Content