एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील खर्ची खुर्द येथे महात्मा फुले योजनेंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. यात १५० रूग्णांची तपासणी करण्यात आली.
तालुक्यातील खर्ची खु.येथे महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. १५० जणांची तपासणी केली असून २० रुग्णांचे ऑपरेशन केले जाणार आहे. यावेळी नाक, कान, घसा, डोळे व इ.सी.जी.इत्यादीची तपासणी करण्यात आली. सदर शिबिर किशोर पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील डॉ.आकाश डोंगरवार, डॉ.आदित्य नांदेडकर, डॉ.अनुजा गाडगीळ, डॉ.हर्षल महाजन, डॉ.शुभम मानकर यांनी रुग्णांची तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले. शिबिराचा गावातील लोकांनी लाभ घेतला.