मुलगाच निघाला चोर ; पोलिसांनी दागिने केले परत

 

रावेर, प्रतिनिधी । घराला कुलूप असतांना घरातील रोख रक्कम, सोने-चांदी यांचे दागिने असे एकूण ८५ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १५ डिसेंबर २०२० रोजी निरूळ येथे घडली होती. याबाबत रावेर पोलिसांनी केलेल्या चौकशीत घरातील मुलगाच असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस देखील आवक झालेत.

निरूळ येथील रहिवासी सयाबाई योगराज खैरे (वय ५०) यांच्या घराला १५ डिसेंबर २०२० रोजीच्या रात्री कुलूप असतांना घरफोडी होऊन घरातील रोख रक्कम, सोने-चांदी यांचे दागिने चोरून नेली होती. यात रोख २० हजार, ३५ हजार किमतीची ७ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३० हजार किमतीच्या चांदीच्या दोन पाटल्या व एक चांदीचे कडे असा एकूण ८५ हजारांचा मुद्देमालचा समावेश होता. घरफोडी झाल्याने सयाबाई खैरे ह्या फार दुख्खी झाल्या होत्या. त्यांनी घरफोडीची घटना रावेर पोलिसांना कळवून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला होता.

या घरफोडीची चौकशी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शन खाली पीएसआय मनोहर जाधव ,पो. कॉ. जगदीश पाटील, पो. ना. महेंद्र सुरवाडे, पो. कॉ. प्रमोद पाटील, पो. कॉ. सुरेश मेढे, पो. कॉ. सुकेश तडवी, पो. कॉ. महेश मोगरे, कुणाल सोनवणे, विशाल पाटील, प्रमोद पाटील यांच्या पथकाने सखोल चौकशी केली. यात फिर्यादीचा मुलगा जितेंद्र योगराज खैरे हाच चोर असल्याचे उघड झाले. यानंतर जितेंद्र यास पथकाने ताब्यात घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. न्या. श्री. राठोड यांच्या न्यायालयाने रोख रक्कम व दागिने परत फिर्यादीस देण्याचे आदेश दिलेत. न्यायालयाच्या आदेशाने जेव्हा फिर्यादीस रोख रक्कम व दागिने पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी परत केले. तेव्हा फिर्यादीच्या डोळ्यात आनंद आश्रू तरळले. फिर्यादीने आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, मला विश्वास होता की चोरीस गेलेला मुद्देमाल मला परत मिळेल, मात्र माझाच मुलगा चोर निघेल स्वप्नात विचार सुद्धा केला नव्हता असे म्हणत आपली खंत व्यक्त केली.

Protected Content