दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक; रावेर पोलीसांची कामगिरी

रावेर प्रतिनिधी । शहरातील नवीन रेस्ट हाऊसमागे अजंदा रोडवर अज्ञात ५ ते ६ संशयित गुन्हेगार दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असतांना रावेर पोलीसांना पाहून सर्वांनी पाहून पळ काढतांना दोन जणांना अटक केली आहे. यावेळी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीन रेस्ट हाऊसच्या मागील बाजूस आलेल्या आजंदा रोडवर अज्ञात पाच ते सहा जण हत्यार घेवून अंधारात उभे असल्याची माहिती रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळाली. त्यांनी तातडीने पोउनि शितलकुमार नाईक, सपोनि मनोहर जाधव, पो.ना. महेंद्र सुरवाडे, पो.कॉ. सुनील वंजारी, पो.कॉ. प्रमोद पाटील, पो.कॉ. सुरेश मेढे, पो.कॉ. कुणाल सोनवणे, पो.कॉ.सुकेश तडवी, पो.कॉ. विशाल पाटील, पो.कॉ. मंदार पाटील असे पथक तात्काळ पाठविले.

वीन रेस्ट हाऊस चे मागे अजंदा कडून व रावेरकडून असा ट्रॅप लावून गेले असता एकूण 6 संशयित इसम दिसून आले व ते पोलिसांना पाहून आजूबाजूला पळाले यात दोन जणांना अटक केली आहे. शेख हसन शेख अनवर (वय-24) रा. रावेर फतेहनगर (लाल मिरची पूड), अब्दुल अकिल अब्दुल शकील (वय-२५) रा. रावेर हुसैनि मस्जिद जवळ (छोटा चाकु ) यांना अटक केली. कुऱ्हाड, दोन कटावणी, एक सुती पांढरी दोरी, लाल ठिपके असलेली असे घटनास्थळावर दरोडा टाकण्याचे तयारीत असतानाचे साहित्य मिळून आले आहे. तर फरार झाले आरोपी आकाश लक्ष्मण रिल, शे बाबा शेख कलीम, शे अक्रम मिठाई शे मुसताक, तिबु उर्फ इस्माईलखान याकूब खान असल्याचे सांगितले. दोघांना न्यायालया हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Protected Content