नव्या कोरोनाचे दिल्लीत ४ रुग्ण

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आता दिल्लीत कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकाराने प्रवेश केला आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीत नव्या कोरोनाचे ४ रुग्ण आढळल्याची माहिती दिली.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा आणि प्रसाराचा वेग कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोनामुळे जगभरात नवा पेच निर्माण झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या या नवीन प्रकाराने जगभरात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत १६ देशात पोहोचलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराचा काही दिवसांपूर्वी भारतात शिरकाव झाला होता.

“दिल्लीतील बाधित रूग्णांपैकी चार रूग्णांच्या अहवालात व्हायरसच्या नव्या प्रकाराची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे दिल्लीत येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. आता दिल्लीत नव्याने कोणत्याही प्रवाशाला प्रवेश दिला जाणार नाही. जे लोक बाहेर गावाहून किंवा बाहेरच्या देशांतून दिल्लीत दाखल झाले आहेत, त्यांचा आम्ही मागोवा घेत आहोत”, अशी माहिती सत्येंद्र जैन यांनी दिली.

 

Protected Content