कौटुंबिक वादातून गर्भवती विवाहितेला मारहाण; पतीसह दोघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । कौटुंबिक भांडणातून ननंद सोबत भांडण झाल्याने गर्भवती महिलेच्या पतीने तीला लाकडी दांडक्याने मारहाण केली केल्याचा प्रकार रामेश्वर कॉलनीत घडला आहे. तसेच ननंदच्यापतीने देखील शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याने पतीसह ननंद व तिच्यापतीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनीतील मंगलपुरी भागातील रहिवासी सोनाली सागर गायकवाड ही विवाहीता पतीस सागर व मुलीसोबत वास्तव्यास आहे. २५ ऑगस्ट रोजी या महिलेच्या सासूचे श्राद्ध असल्याने ते कुटुंबासोबत रेणुकानगरात राहणार्‍या त्यांच्या ननंदकडे गेले होते. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्या विवाहितेची ननंद सुनिता भावसार यांनी घरगुती कामावरुन तिच्यासोबत भांडण करु लागली. परंतु ही विवाहीता गर्भवती असल्याने माझ्याकडून जास्त काम होत नसल्याचे सांगितल्याने सागर व सुनिता भावसार यांनी त्या विवाहीतेला शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सागर याने आपल्या पत्नी गर्भवती असतांना देखील तिला लाकडी दांडक्याने तर ननंदचा पती संतोष वामन भावसार याने त्या गर्भवती विवाहीतेला घराबाहेर काढीत याठिकाणी परत असल्यास तुला जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली होती.

पोलीसांकडून प्रकाराची तात्काळ दखल
सोनाील गायकवाड ही महिला गर्भवती असल्याने तिच्यापोटात दुखू लागल्याने ती महिला उपचारासाठी गोदावरील हॉस्पीटलमध्ये दाखल झाली होती. या महिलेला ३ सप्टेंबर रोजी मुलगी झाली असून बुधवारी ही महिला तक्रार देण्यासाठी आपल्या चिमुकल्या बाळासह एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी या महिलेची सर्व हकिकत जाणून घेतली. त्यानंतर या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेत. तिच्यापतीसह ननंद व नंनदचा पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content