गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक लिव्हर दिन साजरा (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जागतिक लिव्हर दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालय जनजागृतीसाठी आज सोमवार १९ एप्रिल रोजी ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. याआधी रंगबेरंगी रांगोळीद्वारे लिव्हर रेखाटण्यात आला. बी.एसस्‍सी. विद्यार्थीचे पोस्टर प्रदर्शन करण्यात आले.

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयात आज सोमवार १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जागतिक लिव्हर दिनानिमित्‍त प्राध्यापक जॉन गिल्ट्स यांनी ऑनलाईन वेबिनारद्वारे मोलाचे मार्गदर्शन करून माहिती दिली. यकृताची (लिव्हर) काळजी कशी घावी?  लिव्हरचे कार्य व महत्व वैद्यकीयदृष्या उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रागंणात बीएसस्सी नर्सिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी लिव्हर आकृती रांगोळीद्वारे मांडली. याप्रसंगी विभागप्रमुख प्रा. मनोरमा इसा , प्रा.शिवानंद बिरादार, प्रा. पियुष वाघ, प्रा.सागर मसने, प्रा.मंजू साहू, प्रा.उज्वला कदम, प्रा.पूनम इंगळकर, प्रा.पुजा तायडे यांच्यासह एम.एस्सी नर्सिंगच्या प्रथम, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकवृंद उपस्थीत होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/126310642814719

 

Protected Content