रेमडेसीविर इंजेक्शन पुरवठा सुरळीत करा, अन्यथा प्रांताधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोना रुग्णांना आवश्यक तेवढे रेमडेसीविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा 22 एप्रिल पर्यंत 2 दिवसांत सुरळीत न झाल्यास 23 एप्रिल 2021 रोजी कोरोनाचे सर्व नियम मोडुन जनआंदोलन उभारणारून प्रांताधिकारी यांना काळे फासणार असा इशारा विविध संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. 

सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनाद्वारे संभाजी सेना, सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, समता सैनिक दल, वर्धमानभाऊ मित्र मंडळ, वीरशैव लिंगायत गवळी समाज मंडळ  यांनी हा जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिला आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, रेमडेसीवीर इंजेक्शन चा पुरवठा शासनाने ताब्यात घेतल्यापासून रेमडेसीविर मिळवण्याकरता पेशंटच्या नातेवाईकांना रेमडेसीविर इंजेक्शन मिळत नाही अगोदर जादा पैसे देऊन इंजेक्शन मिळत होते सध्या काही जण १५ ते २० हजार रुपयांना इंजेक्शन विक्री करीत आहेत. रेमडेसीवरचा तुटवडा आणि ऑक्सिजनची कमतरता या दोन्ही गोष्टींमुळे शहरातील डॉक्टर मंडळी आणि मेडिकल धारक हवालदिल तर झालेले आहेत शिवाय सामान्य जनता आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मंडळी आणि मेडिकल धारक यांच्या बद्दल सर्व सामान्य जनतेच्या मनात दिवसेंदिवस असंतोष निर्माण होत आहे  भविष्यात  एखादे हॉस्पिटल अथवा डॉक्टर किंवा कदाचित एखादा मेडिकल धारक या असंतोषाचा बळी पडू शकतो,  प्रत्येकाच्या जवळचे नातेवाईक असतील मित्र म्हणा किंवा मित्रपरिवारातील कुणी ना कुणी प्रत्यक्ष डोळ्यासमोर मरत आहे म्हणून येत्या दोन दिवसांत जर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जेवढे पेशंट (रुग्ण) आहेत तेवढे रेमडेसीविर आणि जेवढा आवश्यक आहे तेवढा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत 22 एप्रिल पर्यंत न झाल्यास २३ एप्रिल रोजी संभाजी सेना, सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, समता सैनिक दल, वर्धमानभाऊ मित्र मंडळ, वीरशैव लिंगायत गवळी समाज मंडळ,  लक्ष्मण शिवाजी शिरसाठ, दिलीप गणसिंग घोरपडे, धर्मभूषण भगवान बागुल, वर्धमान सुभाषचंद धाडीवाल, विजय सिदाप्पा गवळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसेच वेळेवर रेमडेसीविर आणि ऑक्सिजन ज्यांचे ज्यांचे आप्तस्वकीय मरण पावले आहेत ते पीडित असे सर्व मिळून उपविभागीय अधिकारी यांना काळे फासतील प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला शासन आणि प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पोलीस अधीक्षक जळगांव व पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांच्या व्हाट्सएप नंबर्सवर आणि शासकीय तसेच वैयक्तिक ईमेल आयडीवर तसेच पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.

Protected Content