यावल येथील प्रतिबंधीत क्षेत्रातील कुटुंबांना नगर परिषदेतर्फे औषधींचे वाटप

यावल, प्रतिनिधी । शहरातील कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून या परिसरातील नागरिकांना नगर परिषदेतर्फे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधीचे वाटप करण्यात आले.

कोरोना विषाणुच्या संसर्गाचा मागील सात दिवसात यावल शहर आणि तालुक्यात अचानक कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेगाने शिरकाव झाल्याने बाधीतांचा आकडा हा आरोग्य प्रशासनाची व नागरीकांची झोप उडविणारा आहे. प्रशासकीय यंत्रणाही अधिक काळजीने परिस्थितीवर लक्ष ठेवुन असुन नागरीकांनी या आजाराचा रोखण्यासाठी दिलेल्या नियम व अटीचे काटेकोर पालन करावे असे नगरसेवक अतुल वसंत पाटील योनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले. यावल तालुक्यातील दहीगाव येथे एक कोरपावली दोन फैजपुर शहरात दोन आणि यावल शहरात तिन जण हे कोरोना पॉझिटिव्ह मिळुन आले होते. त्यातील दोन जणांचा मृत्यु झाला आहे. यावल नगर परिषद प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने दक्षता घेवुन नागरी सुरक्षेचा उपाय म्हणुन यावल शहरातील पुर्णवाद नगर, तिरुपती नगर, सुदर्शन चित्र मंदीर परिसर हे मागील तिन दिवसापासुन १४ दिवसा करीता प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात येवुन हे क्षेत्र सिल करण्यात आले आहे. दरम्यान, आज या तिघ प्रतिबंधीत क्षेत्रातील एकुण ८६ कुटुंबाना विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरेबोले यांच्या आदेशाने व तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी प्रतिबंधीत क्षेत्रातील होम क्वॉरेंटाईन करण्यात कुटुंबातील नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेवुन मुख्याधिकारी बबन तडवी व नगरपरिषद प्रशासनाच्या सहाय्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या हॉमीयोपॅथीक आरसेनिक ३० या औषधीचे वाटप प्रभागाचे नगरसेवक अतुल पाटील यांच्या हस्ते तर सुर्दशन चित्र मंदीर परिसरात या प्रभागाच्या नगरसेविका रूख्ममणी भालेराव ( महाजन ) यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्यात यावेळी त्यांनी नागरीकांना शासनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे नागरीकांना आवाहन केले .

Protected Content