जॉन्सन बेबी पावडरचा परवाना कायमस्वरूपी रद्द

मुंबई -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरचा परवाना राज्य सरकारने कायमस्वरूपी रद्द केला असून यामुळे ही पावडर आता कुणालाही विकता येणार नाही.

जॅान्सन अँड जॉन्सन कंपनीने उत्पादित केलेल्या ‘जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनाचा उत्पादन परवाना कायमचा रद्द करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. या प्रसाधनांचे नमुने प्रशासनाच्या नाशिक व पुणे येथील औषध निरीक्षकांनी गुणवत्ता चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्याचे कारण देत हा परवाना रद्द करण्यात आला आहे. यामुळे आता या बेबी पावडरवर पूर्णत: बंदी आल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही पावडर पीएच हा प्रमाणित मानकानुसार नाही. त्याच्या वापराने नवजात शिशु आणि लहान मुलांच्या त्वचेला नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेबी पावडरचे उत्पादन सुरू ठेवणे हे जनहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही. त्यामुळे संस्थेच्या मुलुंड येथील जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर उत्पादन कारखान्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन खात्यातर्फे देण्यात आलेली आहे.

Protected Content