खासगी डॉक्टर्सच्या मागण्यांसाठी भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे निवेदन (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । राज्य सरकारने खासगी डॉक्टर्सला कोरोना योध्दा म्हणून विम्याचे संरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी आज भाजपच्या वैद्यकीय आघडीतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख डॉ. नि. तु. पाटील आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मार्च २०२० पासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातला आहे, भारतात देखील त्याचा कहर अनुभवत आहोत. कोरोनाचा कहर जसजसा वाढत गेला तसा शासकीय आरोग्ययंत्रणा कमी पड़त गेली आणि मग खाजगी रुग्णालय,खाजगी डॉक्टर यांच्या सेवा शासनाने अधिग्रहित केल्या. त्यावेळस सर्व खाजगी डॉक्टर यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पैकेज अंतर्गत ५० लाख विमाच कवच राहील असे देखील सांगण्यात आले. ११ ऑगस्टला त्यानुसार आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. साधना तायडे यांनी आदेश देखील काढले. पण शासनाने फक्त डॉक्टर मंडळींच्या तौंडाला पाने पुसली खरे पाहता कोरोना काळात सेवा देतांना संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झालेल्या खाजगी डॉ.मंडळींचे विमा दावे अमान्य करण्यात आले आहेत.  यामुळे वैद्यकीय आघाडीतर्फे सर्व नौंदणीकृत खाजगी डॉंक्टराना रु.५० लाख विमा कवच जाहीर करावे. शासनाने कोविडशी लढतांना मृत्यू झालेल्या डॉक्टर मंडळीना ‘शहीद” दर्जा देयून,त्यांना मरणोत्तर सम्मानित करण्यात यावे. करोनामुळे मृत्यू झालेल्या कोरोना योद्धयांची प्रमाणित माहिती देण्यात यावी. कोरोनामुळे मूत्यू झालेल्या कोरोना योद्धयांचे विमा प्रस्ताव १५ दिवसात तयार करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनांवर भाजप जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे. उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ. नि. तू. पाटील, डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. सतीश पाटील, डॉ. अविनाश महाजन, डॉ. मनीष विसपुते, डॉ. अभिषेक फिरके आदींची स्वाक्षरी आहे.

 

 

https://www.facebook.com/watch/?v=1059650557821583

Protected Content