रावेर महसूल पथकाची अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

 

रावेर, प्रतिनिधी । रावेर महसूल पथकाने अवैध वाळुने भरलेले दोन ट्रक्टर-ट्रॉली पकडण्यात आले आहे ही कारवाई पहाटच्या सुमारास करण्यात आली आहे. यामुळे अवैध वाळुची वाहतुक करणा-यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, के-हाळा नजिक अवैध वाळुची वाहतुक होत असल्याची माहिती महसूल पथकला मिळताच सकाळी सहाच्या सुमारास तहसिलदार उषाराणी देवगुणे, नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली खानापुर मंडळ अधिकारी विठोबा पाटील, यासीन तडवी, तलाठी शैलेश झोटे या महसूल पथकाने अवैध वाळुच्या ट्रक्टरवर धडक करवाई करत एमएच २७ एल २५६३ हे ट्रक्टर-ट्रॉली जप्त करण्यात आले आहे. तसेच काल दि १४ रोजी सायंकाळी सुध्दा विना नंबरचे अवैध वाळुने भरलेले एक ट्रक्टर-ट्रॉली मंडळ अधिकारी सौ. तडवी यांनी पकडले असून निंभोरा पोलिस स्टेशनला जप्त करण्यात आले आहे.

Protected Content